राज्य लॉटरीचा दिवाळी धमाका!!एक कोटीचे बक्षीस यवतमाळच्या ग्राहकाला!लॉटरी विक्रेता संघटनेतर्फे विक्रेत्याचे अभिनंदन

राज्य लॉटरीचा दिवाळी धमाका!!एक कोटीचे बक्षीस यवतमाळच्या ग्राहकाला!लॉटरी विक्रेता संघटनेतर्फे विक्रेत्याचे अभिनंदन.मुंबई दि. प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेतर्फे आयोजित महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडतीच्या खरेदीवर विक्रेत्यांना रोख रकमेची आकर्षक बक्षिसे असल्याने यंदा लॉटरीची विक्रमी विक्री झाली. एक कोटीचे बक्षीस यवतमाळच्या न्यू जय अंबे लॉटरी केंद्रातल्या ग्राहकाला मिळाले असून यंदाची दिवाळी ही ग्राहकांसोबत विक्रेत्यांनाही धनवान करून गेली असल्याची माहिती लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते श्री विलास सातार्डेकर यांनी दिली आणि विजेत्याचे अभिनंदन केले आहे.महाराष्ट्र राज्याच्या दिवाळी भव्यतम सोडतीचे ग्राहकांमध्ये प्रचंड आकर्षण असून लॉटरीची वैभवशाली परंपरा आहे. लॉटरी संघटनेने लॉटरीची विक्रमी विक्री व्हावी या प्रामाणिक हेतूने एक योजना राबविली त्यात २५ तिकीटांच्या खरेदीवर एक रोख रकमेचे आकर्षक कुपन देण्यात आले त्याला महाराष्ट्र भरातून विक्रेत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि लॉटरीच्या विक्रीवर सकारात्मक परिणाम झाला. नवी मुंबईत मंगळवारी दिवाळी भव्यतम सोडत काढून निकाल जाहीर झाला त्या पार्श्वभूमीवर सातार्डेकर पत्रकारांशी बोलत होते.राज्य शासनाने २०० रुपये तिकीटात कोट्यावधी रुपयांची बक्षिसे जाहीर केली होती त्यात पहिले बक्षीस १ करोड जे यवतमाळ येथील न्यू अंबे लॉटरी विक्रेता भंडार येथील ग्राहकाला लागले तर प्रोत्साहनपर २ लाखांची चार बक्षिसे दुसरी ५लाखाची पाच बक्षिसे तिसरी १ लाखाची पाच बक्षिसे यासह सर्व मालिकांसाठी अनेक बक्षिसे दिवाळी सणासाठी लावण्यात आली होती विजेत्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विलास सातार्डेकर यांनी विक्रेत्यांसाठी जो कुपन निकाल घोषित केला होता त्यानुसार लाखो रुपयांची बक्षिसे आहेत बक्षिसांची रचना ही लॉटरी विभागाच्या निकालावर करण्यात आली आहे या कुपनात पहिले बक्षिस ५० हजार (१० हजारांची ५ बक्षिसे) दुसरे बक्षिस ५० हजार(५ हजारांची १० बक्षिसे) तिसरे बक्षिस २० हजार (२ हजारांची १० बक्षिसे) आणि चौथे बक्षिस १० हजार (१ हजाराची १० बक्षिसे) अशी आहेत.ज्या विक्रेत्यांनी (एजंट) तिकिट विक्री थेट केली असेल त्यांनी कुपनसह व लॉटरी केंद्राच्या नाव पत्त्यासह आपला फोटो हा थेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांपर्यत पोहोचवावा जेणेकरून त्याची शहानिशा करून बक्षिसांची रक्कम विक्रेत्याला देणे शक्य होईल या संदर्भात अधिक माहितीसाठी विलास सातार्डेकर ( संस्थापक अध्यक्ष)(९८९२८१७५९७) राजेश बोरकर (सरचिटणीस) (९००४४७१८८५)कमलेश विश्वकर्मा(उपाध्यक्ष) (८९२८४१२२५८) या क्रमांकावर येत्या दहा दिवसांत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!