*चौपाळा ता. नंदुरबार येथील तरुण व जेष्ठांचा,, संत दगा बापू महाराज यांच्या १०८ ग्रामपरिक्रमा संकल्प पूर्तीसाठी पुढाकार

*चौपाळा ता. नंदुरबार येथील तरुण व जेष्ठांचा,, संत दगा बापू महाराज यांच्या १०८ ग्रामपरिक्रमा संकल्प पूर्तीसाठी पुढाकार*संत दगा बापू महाराज हे नंदुरबार जिल्ह्यातील संतांपैकी एक महान संत होऊन गेले. भगवदनामाचे स्मरण आणि सनातन संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच समाजात ईश्वरभक्ती रुजवून एक सुसंस्कृत समाज निर्माण करण्याच्या विचाराने त्यांनी परिसरात अनेक धार्मिक उपक्रम सुरू केले. त्यांनी सुरू केलेला १०८ ग्राम परिक्रमेच्या संकल्पाला चौपाळा (ता. नंदुरबार) येथील तरुण आणि ज्येष्ठांनी पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.*या संकल्पाच्या उद्देश, ग्राम स्वच्छता, मंदिर स्वच्छता,सामूहिक रामनामाचे आयोजन*, आणि सनातन धर्म, अध्यात्मिक संस्कृती आणि संस्कारांचे संवर्धन करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. संत दगा बापू महाराजांच्या पवित्र विचारांचा परिसरात प्रसार करण्यासाठी ही सुरूवात करण्यात आली आहे.चौपाळा येथील तरुण मित्रांनी यासाठी पुढाकार घेतला असून, त्यांनी आतापर्यंत 46 गावांची परिक्रमा पूर्ण केली आहे. या प्रवासात, ते प्रत्येक गावात जाण्यापूर्वी ग्रामस्थांना पूर्वसूचना देतात व त्या गावात रामनाम स्मरण व भजन *कार्यक्रमांचे दर बुधवारी आयोजन करतात.*रात्री आठ ला हे तरुण स्वतःची साउंड सिस्टम घेऊन येतात 200 – 250 संख्या त्यांच्या सोबत असते , या पवित्र संकल्पाच्या माध्यमातून एक गाव गाव जोडली जात आहेत. अशा पवित्र उपक्रमांद्वारे संत दगा बापू महाराजांच्या संकल्पपूर्तीचा प्रारंभ करण्यात आला आहे.”ईश्वराची भक्ती ही मनाची पवित्रता आणि आत्म्याचे समाधान आहे; ती जीवनाला दिशा देऊन सत्याच्या मार्गावर चालण्याचे बळ देते….” मनाची पवित्रता आणि सत्याचा मार्गावर चालण्याचा संत दगाबापू यांच्या विचारांना हि तरुण मंडळी आजच्या या धावपळीच्या आणि डिजिटल युगात जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही अत्यंत कौतुकाची बाब आहे.*हरे राम हरे राम राम राम हरे हरे*💥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!