– मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी भारतीयांनी जाणीवपूर्वक पुढे येण्याची गरज : प्रा.डॉ. थोरातधुळे
,येथील मातोश्री गुंताबाई आखाडे – बहुउद्देशिय संस्था यांच्यावतीने मतदान राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर डॉ.डी.एम.आखाडे यांच्या कार्यालयात आयोजित परिसंवादात प्रा. डॉ. घनःश्याम – थोरात यांनी आपले विचार मांडले. – तात्कालीन ब्रिटिश शासनापुढे विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुवीश्रमीचे अस्पृश्यांचे वार्षिक उत्पन्न १४४ रु प्रमाणे असेल व 1 कमीत कमी इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण असेल अशांनाच मतदानाचा हक्क अधिकार द्यावा अशी मागणी केली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब – आंबेडकर यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मागणीला विरोध करत ज्याला र आपले हीत अहित कळते अशा सज्ञान व्यक्तींना मतदानाचा हक्क – अधिकार दिलाच पाहिजे त्यासाठी शिक्षणाची, उत्पन्नाची अट नसावी अशी आग्रही भुमीका मांडली. एकंदरीत युरोप अमेरिकेच्या लोकांना 1 मतदानाच्या न्याय हक्कासाठी अथक संघर्ष करावा लागतो. अमेरिकेत महिला वर्गाला मतदानाच्या हक्कासाठी रस्त्यावर यावे लागते. तिथे भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारीक क्रांतीने समस्त भारतीयांना मतदानाचा न्याय हक्क कायदेशिररित्या मिळवून दिला आहे. त्या हक्क अधिकाराची जाणीव पूर्वक भान ठेवून ‘मत’ हे मोठे वौचारीक दान ही आहे ही गोष्ट लक्षात घेवून समस्त भारतीयांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्रीय लोकशाही उत्सव समजून आपला हक्क, कर्तव्य पार पाडले – पाहिजेत असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्काराचे नॉमीनी प्रख्यात न विचारवंत, मानवाधिकाराचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. घनःश्याम थोरात यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जर्नलिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण दुसाने (सोनार), इंजिनियर अविनाश थोरात, अरुण डमडेरे, रागिनी -. (सोनी) मराठे, गौतम शिरसाठ, ईश्वर वाघ उपस्थित होते. आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. एम. आखाडे यांनी व्यक्त केले.