मा.अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे मॅडम व मा.शोभा बाविस्कर मॅडम उप आयुक्त म.न.पा ( नोडल अधिकारी स्वीप पथक ) यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 18/11/2024 रोजी न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे मतदान जन जागृती अंतर्गत मानवी साखळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच हायस्कूलचे सर्व कर्मचारी यांचा मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमांस sweep टीम चे अधिकारी श्री सुनील दावळे आयटीआय धुळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदार शपथ दिली. सोबत श्री.एस.जि. नेरकर(कला शिक्षक) श्री रणजीत शिंदे, श्री विशाल शिंदे, सौ तारकेश्वरी सुनील दावळे अध्यक्ष उडान फाउंडेशन धुळे, डॉक्टर श्री डी एम आखाडे अध्यक्ष मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे ,श्री नाना पाटील(लिपिक महिला व बाल विकास विभाग),श्री.रुपेश वाडीले (लिपिक म.न.पा) तसेच श्री बारी भाऊसाहेब इत्यादी उपस्थित होते.
न्यू सिटी हायस्कूल येथे मतदान जनजागृती करण्यासाठी साखळी पद्धतीने जनजागृती संपन्न मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांचा सहभाग.
