भडगांव(खैरवे) येथे संविधान गौरव दिवस उत्साहात साजरा

*भडगांव(खैरवे) येथे संविधान गौरव दिवस उत्साहात साजरा* शहादा तालुक्यातील भडगांव-खैरवे येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिवस बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत ब्ल्यू टायगर चौकात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्ल्यू टायगर ग्रुप चे अध्यक्ष संजुदादा पानपाटिल यांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द व संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले, त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक विजयसिंग महादु गिरासे यांनी संविधान पुस्तकाचे पूजन करून महामानवास वंदन केले. ब्ल्यू टायगर ग्रुपचे सचिव, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे युवा वक्ते सचिन पानपाटिल यांनी आपल्या व्याख्यानातून संविधानाचे महत्त्व, संविधानातून सर्व नागरिकांना प्राप्त झालेले मुलभुत हक्क आणि अधिकार उपस्थित नागरिकांना सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि शेवटी संविधानाचा सरनामा तथा प्रास्ताविकेचे वाचन व ग्रहण केले. सदर कार्यक्रमास ब्ल्यू टायगर ग्रुप चे अध्यक्ष संजय पानपाटिल, कार्याध्यक्ष, भिमादादा पानपाटिल, शहादा पंचायत समिति सदस्य प्रतिनिधि देवेंद्र पानपाटिल, पोलिसपाटिल धनराज पानपाटिल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य मल्हारी चित्ते, विजयसिंग गिरासे, पंढरीनाथ निकुंबे, रणजीतसिंग गिरासे, उखा गवळे, अमृत सोनवणे, आप्पा पानपाटिल, मक्कन पानपाटिल, पंडित गवळे, तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पानपाटिल, विजय निकुंबे, जतन पानपाटिल, गौतम निकुंबे, कांतिलाल पानपाटिल, चंद्रसिंग भील, सुनिल मुसळदे, पंढरीनाथ पानपाटिल, समाधान भील, विजय पानपाटिल, रोहित गिरासे, सुनील पवार, गोपाल निकुंबे, ब्ल्यू टायगर ग्रुप व टायगर फोर्स चे बहुसंख्य सदस्य, आंगनवाडी सेविका मंगलाबाई चित्ते, आशा वर्कर सुनिता निकुंबे यांच्यासह असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!