मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय कृषी व पशुसंशोधन संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यामाने संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न…………….नेहरु युवा केंद्र धुळे,धुळे एज्युकेशन सोसायटीचे जोरा.सिटी हायस्कूल धुळे वमातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय कृषी व पशुसंशोधन संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमास मा.अशोककुमार मेघवाल साहेब जिल्हा युवा अधिकारी, डॉ.डी.एम.आखाडे,अध्यक्ष , मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे तसेच धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आबासो. युवराजजी करनकाळ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला जोरा.सिटी हायस्कूल तथा महाविद्यालयाचे प्राचार्यश्री. अनारसिंग पावरा उपस्थित होते. या संविधान दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मा.घनश्यामजी थोरात यांची उपस्थिती होती.प्रमुख वक्ते श्री.राहुल जंगलु चव्हाण सर(उपशिक्षक,जो.रा.सिटी हायस्कूल, धुळे) यांनी संविधानाविषयी सविस्तर आणि बहुमूल्य मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रमाला शाळेतील पर्यवेक्षक श्री नागरे सर तथा श्री आर ए पावरा सर तसेच शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.सदरील कार्यक्रमात शाळेतील नववी अ चा विद्यार्थी विशाल मोरे याने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केलेकार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना भेट स्वरूप पेन वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
Related Posts
मानव विकास पत्रकार संघाची* *चोपडा विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.
*मानव विकास पत्रकार संघाची* *चोपडा विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली…*मानव विकास पत्रकार संघाची आज दिनांक 11/08/24 रविवार रोजी चोपड़ा शासकीय…
तमाम मंसूरी/पिंजारी बांधवांना आवाहन करण्यात येते की, जिल्हा व तालुका कार्यकारीणी गठीत करणेसाठी इच्छुकांनी आपली नावे,आधारकार्ड व संमती पत्रासह वैयक्तिकरित्या माझ्याकडे जमा करावीत असे आवाहन करण्यात येत आहेत
जाहीर आवाहन!जाहीर आवाहन!!जाहीर आवाहन!!!=====================काल मर्यादादि.25 मे 2023 ते दि.27 मे 2023=====================तमाम मंसूरी/पिंजारीसमाज बांधवांना कळविण्यात येते की,”जमीअतुल मंसूर”चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जावेद…
सुतगिरणी प्रशासनाविरोधात कामगारांचे आंदोलन सुरू!
सुतगिरणी बंद, सुतगिरणी प्रशासनाविरोधात कामगारांचा संप व कामबंद आंदोलन! ६ वर्षांचा पीएफ मिळावा, बोनस, दवाखाना, कॅन्टीन व पिण्याच्या पाण्याची मागणीसह…