ईव्हीएम घोळामुळेच भाजपाला यश शिरपूरातील अपक्ष उमेदवार गितांजली ताई कोळींचा आरोप

*ईव्हीएम घोळामुळेच भाजपाला यश शिरपूरातील अपक्ष उमेदवार गितांजली ताई कोळींचा आरोप*

दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी

दोंडाईचा, राज्यभरात भाजपने मिळविलेल्या भरभरून यशावर शंका उपस्थित केल्या जात असून सत्तेचा गैरवापर करत भाजपने ईव्हीएम प्रणालीत घोळकेल्यामुळेचशिरपूर मतदारसंघात त्यांना यश मिळाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार गितांजली कोळी यांनी केला. तसेच याबाचत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेला रवींद्र कोळी, गिरधर महाले, हेमराज कोळी आदी उपस्थित होते. गितांजली कोळी यांनी सांगितले की, मला अनेक फोन आले, त्यांनी तुम्हाला मतदान कसे पडले नाही, असे सांगितले. मला जास्तीत जास्त ५० हजार व कमीत कमी ३० हजार मते पडण्याचा विश्वास होता. कारण, शिरपूर मतदारसंघातील सहा उमेदवारांपैकी सर्वात जास्त मी गावोगावी फिरली असताना न फिरणारे उमेदवारांना पाच हजार मते आहेत. तर मी किमान ६० ते ७० गावांमध्ये प्रचार केला असताना देखील फारसे मतदान पडले नाही. त्यामुळे मतांमध्ये घोळ झाला असून हे आदिवासी टोकरे कोळी जमातीला धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे मोठे षडयंत्र आहे. त्यामुळ मी शिरपूर राखीव विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम यंत्रात झालेल्या घोटाळ्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनीसांगितले. शिरपुरात शेतकरी मोठ्धासंकटात आहे. अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही.त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळेआमदार पावरा यांची लोकप्रियता देखील घसरत चालली आहे. तरीही ते निवडून आले हे मात्र मान्य नाही. त्यामुळे शिरपूर मतदारसंघात मतदारांचा विश्वास घात झाला असल्याचा आरोप गितांजली कोळी यांनी केला. राज्यात मोठ्धा प्रमाणात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी आदी जमाती- जातींच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावावा. कोळी समाजाचे प्रश्न सोडवावे, अशी मागणी आमची असल्याचे गितांजली कोळी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!