स्व.खंडू पाटील निवासी मतीमंद विद्यालय दोडाईंचा येथे संविधान दिवस साजरा

*स्व.खंडू पाटील निवासी मतीमंद विद्यालय दोडाईंचा येथे संविधान दिवस साजरा* *शिवमावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मा.विजूबापु पाटील यांनी संविधान दिवसाचे औचित्य साधून आपल्या मुलाचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने केला साजरा* *स्व.खंडू पाटील मतीमंद निवासी विद्यालय दोडाईंचा विद्यार्थ्यांनसाठी घसरगुंडी भेट* दोडाईंचा:;दि.26 नोव्हेंबर सुंदरादेवी अंपग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्व.खंडू पाटील निवासी विद्यालय दोडाईंचा जि.धुळे येथे भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला संस्था अध्यक्ष श्री. शिवाजीराव साळुंखे पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिवप्रतिष्ठान युवा संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.विजय पाटील ( विजू बापू ) उपस्थित होते . सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.संविधान दिन या विषयी माहिती सायकॉलॉजिस्ट श्री किशोर शेलार सर यांनी दिली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा.विजय पाटील व शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.26/11 च्या मुंबई वरिल दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना व वीर मरण आलेल्या पोलिसांना सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.विजूबापु पाटील यांचे चिरंजीव श्रीयुवांश याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवस निमित्त शाळेला घसरगुंडी भेट म्हणून देण्यात आली व मुलांना मान्यवरांच्या हस्ते बिस्कीटे वाटपाचा कार्यक्रम झाला.वाढदिवस कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे असते, असा विचार सामान्यपणे केला जातो पाश्चात्त्य पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृतीबरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती वरही पडला आहे. सुशिक्षित होणे म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकातील प्रकरणांची घोकंपट्टी करणे नसून आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे वाढदिवस हा मनुष्याचा जीवनातील एक महत्त्वपुर्ण दिवस असतो.वाढदिवस माणसाचा व्ययक्तीक स्वरूपाचा व्यक्तीगत बाब असते म्हणून आनंदत्सोव तो कशा पद्धतीने साजरा हा त्याचा प्रश्न असतो पण आपले अनुकरण ही आपली येणारी पिढी करत असते सामाजिक कार्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सखल मराठा समाजाचे दोडाईंचा अध्यक्ष व शिवमावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मा.विजूबापु पाटील यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस व संविधान दिनाचे औचित्य साधून स्व.खंडू पाटील मतीमंद आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना घसरगुंडी भेट देऊन साजरा केला.ज्याप्रमाणे मतीमंद मुल एक कुटुंबाचा घटक असतो तसाच तो अन्य सामान्यांप्रमाणे समाजाचाही एक घटक असतो हे समाजाने मान्य करायला हवे सामाजिकरित्या बघितल्यास या मुलांचा सामान्य मुलांमध्ये सहभाग होणे नितांत आवश्यकता असते परंतु बौद्धिक दृष्ट्या कमकुवत व शरिराने अपंगत्व असलेल्या त्या मुलांना सभ्य समाजात स्थान मिळत नाही पण आजही समाजात सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्यांची देवरुपी माणसांची कमतरता नाही मा.विजूबापु पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्वस्व कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर शेलार सर व आभार प्रदर्शन गजेंद्र कानडे सरांनी केले यावेळी शिवप्रतिष्ठान चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. *आण्णा कोळी महादेवपुरा दोडाईंचा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!