खजुरात अळ्या तळोदा शहरात एकच खळबळ

खजुरात अळ्या तळोदा शहरात एकच खळबळ. तळोदा : येथील एका दुकानातून घेतलेल्या खजूरमध्ये दिसणाऱ्या अळ्या.तळोदा, ता. ६शहरातील शहादा रस्त्यावरील एका दुकानात विक्रीस ठेवलेल्या खजूरामध्ये अळ्या आढळल्याची घटन उघडकीस आली आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या खजुरामध्ये अळ्या दिसल्यानंतर त्यांनी संबंधित दुकान मालकाकडे तक्रार केल्यानंतर मालकाने सदर ग्राहकास डिस्ट्रीब्यूटरकडे जाण्याचा अजब सल्ला दिला. तसेच पोलीस प्रशासनाकडे गेलेल्या ग्राहकाला पोलीस प्रशासनानेही अन्न औषध प्रशासनाकडे बोट दाखवले. दरम्यान सदर बाब सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरभर खळबळ उडाली आहे.तळोदा शहरातील शहादा रस्त्यावरील एका दुकानात खरेदी केलेल्या खजुराचा पाकिटात चक्क आळ्या आढळल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वीही तळोद्यातील विविध खाद्यपदार्थांमध्ये अशाच प्रकारे अळ्या आणि दूषित घटक सापडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याशिवाय याच दुकानातील थंड पेय मध्ये देखील यापूर्वी अळ्या आढळल्याची तक्रार समोर आली होती. याबाबत ग्राहकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही या समस्येवर कोणताही ठोस उपाय करण्यात आला नाही. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. खजूरमध्ये अळ्या आढळल्यानंतर संबंधित ग्राहकाने लागलीच सदर प्रकार दुकान मालकाला सांगितल्यानंतर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. इतरांनी खरेदी केलेल्या मालाबाबत कोणतीही तक्रार नाही, तसेच आम्ही घरी पॅकिंग करत नाही, वरून माल येतो असे म्हणत तुम्ही डिस्ट्रीब्यूटरकडे जा असा अजब सल्ला संबंधित ग्राहकाला दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलीस ठाण्याने देखील अन्न औषध प्रशासनाकडे बोट दाखवले. त्यामुळे ग्राहक अधिकच संतप्त झाला अन् अखेर त्याने घडलेला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केला.कोटसतत अशा प्रकारचे दूषित खाद्यपदार्थ विकले जात असल्याने आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने पावले उचलली पाहिजेत. घडलेल्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत दोषी दुकानदारांवर कठोर कारवाई करावी.: संतोष वानखेडेग्राहक, तळोदा.चौकटअश्या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासोबतच शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करून अन्नसुरक्षेबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. तळोद्यातील या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये अन्नसुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा वेग अत्यंत संथ असून, दुकानांची नियमित तपासणी होत नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!