*संयुक्त राष्ट्र महासभेने भारताद्वारा सहप्रायोजित ठराव एकमताने मंजूर करत २१ डिसेंबर हा ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून घोषित केला आहे. हा निर्णय ‘वसुधैव कुटुंबकम’ ही कल्पना जगभरात साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.‘हिमालयीन समर्पण ध्यानयोग’चे प्रणेता सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजी गेल्या ३० वर्षांपासून समर्पण ध्यान संस्काराच्या माध्यमातून ध्यान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परमपूज्य स्वामीजींनी आपल्या प्रवचनात अनेकदा सांगितले आहे की, आपल्या पूर्वजांची ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना नुसतीच कल्पना नव्हती. ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे, सर्व समान आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही कल्पना योगवर आधारित होती. जगात असे कोणतेही एक पुस्तक नाही, अशी कोणतीही एक भाषा नाही, असा कोणताही धर्म नाही जो प्रत्येकजण मानत आहे, ज्याद्वारे विश्व एक कुटुंब आहे, असे मानता येईल. योग हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे मनुष्य मनुष्याशी जोडला जात आहे.आज ७२ देशांतील लोक समर्पण ध्यान संस्कारच्या माध्यमातून त्यांची आध्यात्मिक आणि सर्वांगीण प्रगती करत आहेत.
