बिबट्याने मारला श्वानावर ताव,जावदा त.बो. येथे बिबट्या दिसल्याने परिसरात भीति चे वातावरण.

शहादा = तालुक्यातील जावदा . त.बो. या परिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असुन अनेक नागरिकां च्या नजरेस पडत आहे तसेच तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्यात जिवीत हानीच्या घटना घडल्या असुन असाच प्रकार शहादा तालुक्यातील दि.. २०/१२/२०२४ रोजी रात्री ६ ते ६:३० मी. सुमारास जावदा ते पिंपळोद रस्त्या च्या गावा लगत असलेल्या सत्यजीत शॉपच्या समोर अचानक १ कुत्र्या वर बिबट्या ने हल्ला करत बाजुलाच असलेल्या शेतात नेल्याची घटना गावात दुलदेसिंह(जितेंद्रसिंह) गिरासे, दिपकसिंह गिरासे व गावकर्यांच्या समोर घडली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटना लक्षात घेत वनविभागाने पिंजरे लावून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!