ग्रुप ग्रामपंचायत मुखेड सह बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत सदस्य यांना पाच रुपये मुरुम वाहतुक भोवली मा जिल्हा अधिकारी धुळे यांनी केले अपात्र ग्रुप ग्रामपंचायत मुखेड सह बलकुवे ता शिरपूर जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत सदस्य सोपान मुरलीधर महाजन (दोरीक) यांनी ग्रामपंचायत च्या कामात गावात मुरुम वाहतुक केली होती त्या संदर्भात माधवराव दोरीक यांनी माहिती अधिकार अर्ज करुन माहिती मागवली होती व त्यांनी मा जिल्हा अधिकारी धुळे यांचे न्यायालयात दि 22/05/2024 रोजी ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14(ग) नुसार विवाद अर्ज दाखल केला होता त्यांचा अर्ज मंजूर केला व त्या संदर्भात मा गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांचा चौकशी अहवाल नुसार सोपान मुरलीधर महाजन (दोरीक) यांनी ग्रामपंचायत च्या कामात मुरुम वाहतुक करुन स्वताच्या नावाने पाच हजार रुपयाचा चेक काढला होता ते सिद्ध झाल्याने मा जिल्हा अधिकारी धुळे यांनी दि.31/12/2024 रोजी त्यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र केले आहे
ग्रुप ग्रामपंचायत मुखेड सह बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत सदस्य यांना पाच रुपये मुरुम वाहतुक भोवली
