ताहाराबाद येथील वन मजूर राजेंद्र साळुंखे यांची न्याय हक्कासाठी चालेली मूत्याशी झुंज अखेर आज अपयश ठरली

ताहाराबाद येथील वन मजूर राजेंद्र साळुंखे यांची न्याय हक्कासाठी चालेली मूत्याशी झुंज अखेर आज अपयश ठरली असून त्याचं पाच वाजे च्या दरम्यान निधन झाले आहे दि.26/1/2025 रोजी ताहाराबाद प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ताहाराबाद वन विभागाच्या कार्यालया बाहेर वन मजूर राजेंद्र साळुंखे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता त्यात ते 60 ते 65 टक्के भाजल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले होते त्यांच्या उपचार दरम्यान मृत्यू झाला असून आता तरी दोषी वन अधिकाऱ्यांन वरीत कायदेशीर गुन्हा दाखल करणार का असा प्रश्न परिवार व जनता विचारत आहे राजेंद्र साळुंखे यांनी साह महिन्यां पासून वन अधिकाऱ्यांना कडुन होत असलेल्या अन्याया बद्दल प्रशासनाला निवेदन दिले होते परंतु त्यांच्या तक्रारीची वेळेत दखल घेतली नाही तरी त्यांनी दि. 26/1/2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ताहाराबाद वन विभागाच्या कार्यालया बाहेर अंगावर डिझेल टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता व स्वताला जाळुन घेतल्या मुळे ते 60 ते 65 टक्के भाजल्याने त्याच ठिकाणी पडुन राहिले परंतु त्या दिवशी वन अधिकारी व पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आले होते परंतु त्यांच्या परिवाराचा व जनतेचा रोष हा वन अधिकारी व पोलीस प्रशासना बद्दल होता तरीही वन अधिकाऱ्यांन वर्ती कायदेशीर कारवाई झाली नाही अखेर न्याय हक्कासाठी चाललेली त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्याचं आज रोजी निधन झाले आहे तरी एक राजेंद्र साळुंखे यांनी आत्मदहन करुन आपलीं जिवन यात्रा संपवली आहे परंतु महाराष्ट्रात असे कित्येक वन मजूर आहेत ते आजही वन विभागातील अधिकाऱ्यांशी न्याय हक्कासाठी लढत आहेत त्यांना कधी न्याय मिळेल अशा प्रश्न पडला आहे वन अधिकारी हे उपोषणाची दखल घेत नाही आत्मदहनाची दखल घेत नाही त्यांच एक उदाहरण शिरपूर वन विभागातील काम करणाऱ्या वन मजूर भागवत बाबुराव कोळी यांचे असुन त्यांच्या प्रकरणात आज पण उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे यांनी निर्णय घेतला नाही धुळे उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक हे फक्त भ्रष्टाचारी वन अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम करीत आहेत असे त्यांच्या कार्यकाळात दिसून येत आहे तरी अशा वन अधिकाऱ्यांन वरती कधी कारवाई होईल अशा प्रश्न जनतेला पडला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!