सराफ व्यावसायिक प्रशांत गुरव व अभिषेक गुरव त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर करण्याबाबत मा.प्रशांत बच्छाव साहेब, उपआयुक्त,गुन्हे विभाग , नाशिक यांना नाशिक शहरातील समस्त गुरव समाजातर्फे निवेदन

नाशिक- दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक येथील सराफ व्यावसायिक कै. प्रशांत गुरव व त्यांचा मुलगा अभिषेक गुरव यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर करण्याबाबत मा.प्रशांत बच्छाव साहेब, उपआयुक्त,गुन्हे विभाग, नाशिक यांना नाशिक शहरातील समस्त गुरव समाजा तर्फे नाशिक जिल्हा गुरव समाज विकास मंडळ, नाशिक जिल्हा गुरव समाज शिवसेवा प्रतिष्ठान, नाशिक जिल्हा शैव गुरव समाज मंडळ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.नाशिक येथील सराफ बाजारातील नामांकीत सराफ मे. ए. एस. गुरव सराफ अॅन्ड सन्स यांचे मालक सराफ व्यावसायिक प्रशांत आत्माराव गुरव वय ४९ वर्षे आणि त्यांचा मुलगा अभिषेक, वय २९ वर्षे, यांनी दि. १३ जानेवारी २०२५ रोजी यांना संशयास्पद मृत्यू झालेला आहे. त्या अनुषंगाने नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या पत्नी वनीता प्रशांत गुरव यांनी दि. २०/१/२०२५ रोजी गु.र. नं. ३१/२०२५ कलम १०८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच आत्महत्येपूर्वी प्रशांत आत्माराव गुरव यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या लोकांची नावे लिहिलेली आहेत. सदरहू प्रकरणाचा सखोल तपास करून मयत प्रशांत आत्माराव गुरव आणि त्यांचा मुलगा अभिषेक प्रशांत गुरव यांच्या संशयास्पद मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व या कुटुंबीयांवर अन्याय करणाऱ्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येवून कठोर शिक्षा देण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी कै. प्रशांत गुरव यांच्या परिवारा समवेत नाशिक शहरातील अँड. सुरेन्द्र सोनवणे, अँड. पवन गुरव, चंद्रकांत गुरव, भरत निकम, किसन गुरव, प्रकाश सुर्वे, उमाकांत जहागीरदार, हर्शल गुरव, रवींद्र खैरनार, डॉ. रवींद्र सोनोने, शिवदास गुरव, गणेश सोनवणे, प्रमोद पिंपळगावकर, सुशील गुरव, पूजा गुरव, वैशाली खैरनार, मीना सोनवणे, संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे, विकास गुरव, बाळासाहेब गुरव, विनायक गुरव नाशिक जिल्हा गुरव समाज विकास मंडळ, नाशिक जिल्हा गुरव समाज शिवसेवा प्रतिष्ठान, नाशिक जिल्हा शैव गुरव समाज मंडळ या मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!