आपल्याच घरात झाले बंदीवान; रस्त्यावर मालकी हक्क दाखवत चक्क बांधले लोखंडी जाळीने कुंपण; आठवडा होऊनही ग्रामपंचायत प्रशासन उदासीन! अक्कलकुवा( प्रभू तडवी) अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा येथील एका कुटुंबाच्या घरासमोरील रस्त्यावर जबरीने मनमानीपणे मालकी हक्क दाखवीत चक्क रस्त्यावर तार कंपाउंड करून या कुटुंबीयांचा रस्ताच बंद केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या कुटुंबाने वर्षानुवर्ष वापरत असलेला हा रस्ता दैनंदिन वापरासाठी मोकळा करण्याची दाद न्यायालयात धाव घेत मागितली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा येथे जालमसिंग राजाराम वसावे हे आपल्या कुटुंबीयांसह गेल्या वर्षानुवर्षे वास्तव्यास असून त्यांच्या घरासमोर असलेल्या रस्त्याने आपली दैनंदिन कामे करण्यासाठी या रस्त्याच्या वापर वर्षानुवर्षे करत आहेत दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी या रस्त्यावर ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे विकास काम सुरू असताना ते बंद पाडण्यात येऊन या रस्त्यावर आपला मालकी हक्क दाखवत रस्त्याचे काम बंद पाडून या रस्त्यावर सिमेंटचे पाईप उभे करून लोखंडी जाळी लावून कंपाउंड करून चक्क एका कुटुंबाच्या दैनंदिन वापराच्या रस्ताच बंद केल्याने या कुटुंबीयांना प्रवेश करण्यासाठी तसेच त्यांची दुचाकी चार चाकी वाहन ये जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे रस्त्यासाठी न्याय मागितला असताना देखील अद्यापि कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेऊन रस्त्यासाठी दाद मागितली आहे. चौकट :-या रस्त्यावर दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी कॉंक्रिटीकरण करून विकास कामास अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ग्राम विकास अधिकारी श्रावण पाडवी यांनी पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिले असताना देखील या ठिकाणी विकास कामात अडथळा आणून रस्ता करू देण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकाराबाबत नवापाडा ग्रामपंचायतीने पुढाकार घेत वर्षानुवर्षे वहिवाट असलेल्या रस्त्यावर चक्क सिमेंट पोल गाळून लोखंडी जाळी बसवून एका कुटुंबाच्या रस्ताच बंद केला असताना या प्रकाराला आठवडा होत आला असतानाही कुठलीही कारवाई केली नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.चौकट:- या कुटुंबाचा आधारवड असलेला मुलगा गणेश वसावे हा देखील तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना देखील त्यांच्या कुटुंबीयांना या अनपेक्षित संघर्षाला गेल्या आठवड्यापासून तोंड द्यावे लागत असून घरासमोरील अंगणात लोखंडी जाळीचे कंपाऊंड केल्याने आपल्या घरातच जणु बंदीवान झाल्याची स्थिती निर्माण झाल्याने कुटुंबाची मानसिकता बिघडली आहे याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन न्याय देण्याची मागणी या कुटुंबीयांनी केली आहे.
आपल्याच घरात झाले बंदीवान; रस्त्यावर मालकी हक्क दाखवत चक्क बांधले लोखंडी जाळीने कुंपण
