धुळे मध्यवर्ती बस स्थानकात धुळे ते नाशिक बायपास बस साठी बुकींग करणारे अधिकारी यांची मनमानी माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपूर जिल्हा धुळे वय 66 , मी दि.05/03/2025 रोजी दुपारी 12:30 वाजता नाशिक येथे जाण्यासाठी माझ्या परिवार सहीत धुळे येथे मध्यवर्ती बस स्थानक वरती धुळे ते नाशिक बायपास बस साठी तिकीट बुक करण्यासाठी आलो असता माझे कडे जेष्ठ नागरिक चे श्री मा शिरपूर येथील विद्यमान तहसिलदार साहेब राजपात्रीत अधिकारी श्री (महेंद्र एकनाथ माळी) यांचे डिजीटल सहीचे जेष्ठ नागरिक चे कार्ड चा पुरावा दाखवला परंतु तेथील बुकींग खिडकी वरती हजर असलेले कर्मचारी सदर जेष्ठ नागरिक चा तहसिलदार यांचा डिजिटल सहीचा पुरावा आम्ही ग्राह्य धरत नाही असे सांगून तिकीट देण्यास स्पष्ट नकार देऊन तेथील एस टी महामंडळ चे वरीष्ठ अधिकारी मा मोरे साहेब यांना भेटा असे सांगितले तरी मी मोरे साहेब व इतर वरीष्ठ अधिकारी यांची भेट घेतली व त्यांना मी दि.27/11/2024 रोजी म.रा.प.मं वाहतूक शाखा मुंबई येथे ईमेल ने तक्रार दाखल करुन मा तहसिलदार साहेब यांचे सहीचे जेष्ष्ठ नागरीक कार्ड ग्राह्य धरण्यात यावे अशी तक्रार दाखल केली होती त्यानुसार त्यांच्याच म.रा.प.मं चे दि 04/12/2024 रोजी मा तहसील साहेब यांचे सहीचे कार्ड ग्राह्य धरण्यास यावे तसेच,जेष्ठ नागरिक चा वयाचा पुरावा म्हणून, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक आयोगाने दिलेले कार्ड, राजपात्रीत अधिकारी यांनी दिलेले पुरावे ग्राह्य धरण्यात यावे (फक्त त्या कार्ड वरती लाभार्थी चे फोटो असणे आवश्यक आहे) या संदर्भात चे परिपत्रक दाखवले व जन्म नोंद साठी शाळेचा दाखला किंवा मुळ जन्म नोंद वयाचा पुरावा ग्राह्य धरण्यात येतो व आधार कार्ड हे फक्त ओळख पत्र आहे , मा हायकोर्टाचे,मा सुप्रीम कोर्टाचे न्याय निवाडे चे पुरावे दाखवले परंतु तेथील अधिकारी सदर पुरावा ग्राह्य धरत नसल्याने मला दोन तास पर्यत इकडे तिकडे अधिकारींना भेटा असे सांगत हेलपाटे मारायला लावत होते व मला मानसिक व शारीरिक त्रास देत होते तरी म.रा.प.मं.चे मध्यवर्ती बसस्थानक धुळे येथील नाशिक बायपास चे तिकीट बुकींग करणारे त्या दिवशी आपल्या कर्तव्य वरती हजर असलेले कर्मचारी/अधिकारी हे हेतुपूर्वक जाणुनबुजून जेष्ठ नागरिक यांना त्रास देत होते तरी दोन तास मला त्रास दिल्यानंतर मी पुन्हा तिकीट बुकींग करण्यासाठी गेलो तेव्हा सांगितले की मा तहसील साहेब यांचे सहीचे जेष्ष्ठ नागरीक चे कार्ड ग्राह्य धरुन मला तिकीट द्या किंवा माझे कडे खोटे कार्ड आहे असे तुम्ही सिद्ध करुन दाखवा, किंवा मा तहसिलदार साहेब यांचे डिजीटल सहीचे जेष्ष्ठ नागरीक कार्ड चा पुरावा चालणार नाही असे लिहुन द्या किंवा तुमचे परिपत्रक रद्द झाले आहे असा पुरावा द्या किंवा माझे कडे खोटे कार्ड असेल तर माझ्यावरती फोजदारी गुन्हा नोंद करा असे सांगितले तेव्हा मला त्यांनी 50% टक्के सवलीतीचे व माझी पत्नी हे दिव्यांग असल्याने त्यांना 25% टक्के चे सवलती चे नाशिक चे तिकीट दिले तरी मी मा धुळे जिल्हा विभागीय नियंत्रक म.रा.प.मं धुळे यांचे कडे सदर कर्मचारी यांची ईमेल ने तक्रार दाखल केली आहे तरी मा विभागीय नियंत्रक साहेब जेष्ठ नागरिक यांना न्याय देतात किंवा नाही व एस टी महामंडळ चे कर्मचारी यांचे विरुध्द काय कार्यवाही करतात याचे कडे लक्ष लागले आहे
धुळे मध्यवर्ती बस स्थानकात धुळे ते नाशिक बायपास बस साठी बुकींग करणारे अधिकारी यांची मनमानी
