*जी टी पाटील महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणालीवर’ एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
*झुंजार क्रांती नेटवर्क सुधीर गुरव नंदुरबार
नंदुरबार येथील जी टी पाटील महाविद्यालयात २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी तर प्रमुख वक्ते म्हणून आर एफ एन एस विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवाचे डॉ. योगेश दुशिंग हे उपस्थित होते. भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. मार्गदर्शन सत्रात डॉ. योगेश दुशिंग यांनी भारतात घडलेले वास्तुशिल्प आणि त्यामागे दडलेले विज्ञान याचा अत्यंत छानसा संगम साधत विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान व्यवस्थेचे धडे दिलेत व विविध संशोधनांचा उगम भारतात कशा पद्धतीने झाला हे अत्यंत उत्तम पद्धतीने मांडले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी विज्ञान चे महत्त्व समजावून देत सांगितले की कल्पनांना विचारांना शब्दात मांडणं आणि त्यामागचे वास्तव शोधणे याला विज्ञान म्हणतात. दैनंदिन जीवनात वावरताना येणाऱ्या समस्या, पडणारे प्रश्न यातून मार्ग काढणे, त्यांची उकल करणे म्हणजेच विज्ञानातील संशोधनाचा महत्त्वाचा टप्पा असून आणि प्रत्यक्षात विज्ञान समजून घेणे होय. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी क्विझल स्टार प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी समावेश घेतला होता. प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संगीता पिंपरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल कुलकर्णी यांनी केले. कार्यशाळेप्रसंगी जी टी पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस यु पाटील, प्रा. संदीप बडगुजर, आयोजन सचिव डॉ. पि. के. गौतम, प्रा. बी. बी. चौधरी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एम. आर. पाटील, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विज्ञान विभागातील डॉ. जी एच बळदे , डॉ. पी एस पाटील, डॉ. डी एस पाटील, विज्ञान मंडळ समन्वयक डॉ. गौरव गुप्ता, प्रा. जे. सी. पाटील, प्रा. वाय व्ही मराठे, प्रा. जे एस नायका व प्रा. अश्विन पटेल आदी सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले.