*श्रीमती डी.आर.हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…
* झुंजार क्रांती नेटवर्क सुधीर गुरव नंदुरबार
नंदुरबार:येथील श्रीमती डी. आर.हायस्कूल मध्ये 27 जानेवारी वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरवदिन व सी. व्ही. रमण यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज व सी व्ही रमण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक, मुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक हेमंत खैरनार, संजय सैदाणे तसेच मराठी विभाग प्रमुख राजश्री गायकवाड, विज्ञान विभाग प्रमुख दिनेश वाडेकर, प्रशांत पाठक हे उपस्थित होते.विज्ञान शिक्षक राजेंद्र पाटील यांनी विज्ञान परिपाठ घेतला. विद्यार्थी मनोगतातून हर्षवर्धन शिंदे, मुजतबा तारीक पीरजादा, जन्मेंजय पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. अध्यक्षीय भाषणात मा. मुख्याध्यापक पंकज पाठक यांनी मराठी भाषेतील साहित्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व तसेच आधुनिक युगात विज्ञानाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. शाळेतील मराठी विषय शिक्षिका राजश्री गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजभाषा व अभिजात भाषा यातील फरक समजावून सांगितले. विज्ञान शिक्षक प्रशांत पाठक यांनी श्रद्धा असावी आणि अंधश्रद्धा नसावी विज्ञानाने खूप मोठी प्रगती आहे. हे समजावून सांगितले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत विज्ञान सामान्य ज्ञान स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती.यातील यशस्वी विद्यार्थी: लहान गटदक्ष प्रकाश सोनवणे सर्वेश संदीप माहेश्वरी केदार विशाल गवळी ध्रुव प्रसन्न सोनार मोठा गट: मयूर योगेश कुमार गवते मुजताबाद तारिक पिरजादा शशांत जयपाल नेतलेकर दर्शील प्रकल्प भामरे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वकृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी जन्मेंजय जितेंद्र पगारे मुजतबा तारिक पिरजादा भूपेंद्र ज्ञानेश्वर पाटील या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले ,प्रास्ताविक घनश्याम लांबोळे,तर आभार भूषण मराठे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.