भावसार समाजाकडून गुणवंतांचा गौरव
झुंजार क्रांती नेटवर्क सुधीर गुरव नंदुरबार
नंदुरबार –येथील दंडपाणेश्वर मंदिराच्या प्रांगणात जय हिंगलाज माताभावसार प्रतिष्ठान तर्फे समस्त भावसार समाज कार्यकारिणी ,युनायटेड भावसारऑर्गनायझेशन युवा परिषद AIBKM महासभा, महिला मंडळ समस्त भावसार समाज,महिला मंडळ जय हिंगलाज माता भावसार प्रतिष्ठान आयोजित भावसार समाजाचाभंडारा उत्सव आणि गुणगौरव उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्षस्थानी AIBKM महासभा महाराष्ट्रराज्याचे सचिव विलास जूनागडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिकदिलीप भावसार ,बडोदा भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष निलेश भावसार,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार ,कार्याध्यक्ष प्रा. मुकेशवाडेकर, जय हिंगलाज माता प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत धगधगे , भावसारसमाजाचे अध्यक्ष डॉ सुहास भावसार , जळगाव भावसार समाजाचे उपाध्यक्षअनिरुद्ध भावसार ,बडोदा येथील चंद्रकांत भावसार, निलेश भावसार ,वरुणभावसार ,प्रभाकर भावसार, राजेश भावसार, प्रवीण भावसार, सुनिल भावसार,संदीप भावसार, प्रफुल्ल भावसार, गणेश भावसार, जितेंद्र धगधगे ,प्रल्हादभावसार ,कविता भावसार, मुक्ता भावसार ,डॉ रिमा जुनगडे,भावेश भावसारउपस्थित होते.या समारंभात नर्सरी पासून डॉक्टरेट पर्यन्तच्या शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले .यात विशेष प्राविण्यमिळालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. निलेश भावसार यांनी थोडक्यातआपले मनोगत व्यक्त करत समारंभाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा मुकेश वाडेकर यांनी हिंगलाज प्रतिष्ठानच्याविविध उपक्रमांची माहिती दिली तसेच समाजास शासनाकडून मंजूर करण्यातआलेल्या दीड कोटी रुपयांच्या निधी संदर्भात पाठपुरावा या बद्दल अधिकमाहिती देतांना हिंगलाज मातेचे शक्तीपीठ उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचेप्रतिपादन केले. प्रास्तविक प्रल्हाद भावसार यांनी तर सूत्रसंचालन डॉउपेंद्र धगधगे यांनी केले आभार डॉ सुहास भावसार यांनी मानले.कार्यक्रमाससमाजबांधव भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. .