*दोंडाईचात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश* आण्णा कोळी – दोडांईचा
शिंदखेडा तालुका व दोंडाईचा शहरातील ओबीसी/ व्हीजेएनटीचे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने, शिवसेना सचिव संजयजी मोरे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद ढोमसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ओबीसी / व्हीजेएनटी चे प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा ) बाळासाहेब किसवे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ५ मार्च रोजी शिवसेना धुळे जिल्हा जनसंपर्क कार्यालय धुळे येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्हे, ओबीसी/व्हीजेएनटीचे जिल्हाध्यक्ष तथा सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेडा तालुका व दोंडाईचा शहरातील कार्यकर्ते मनोज अशोक पवार, संजू मागरवाडी, रवींद्र दिलीप पवार,प्रल्हाद महादू पवार,नाना बंडू वडर, किशोर राजू शिंदे, रवींद्र नाना वडार, गंगाराम सावळे शिंदे, प्रकाश माणिक पवार, दिनेश मधुकर कुऱ्हाडे, रोहित उदयसिंग ठाकरे, राजेश रमेश शिंदे, बंटी गुरव, सुरज राठोड , तेजस गिरासे, मंथन नेतले, अविनाश गुमाने,विशाल विनोद सूर्यवंशी, स्वप्निल अर्जुन माळी,रोहिदास सुरेश, राजेंद्र बारकू आदिंसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पाडला. याप्रसंगी धुळे जिल्हा शिवसेना जनसंपर्क कार्यालय शिंदखेडा व दोंडाईचा येथील कार्यकर्त्यांना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तळागळातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सदैव तत्पर असतील. महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी सर्व पक्ष प्रवेश केलेल्या शिवसैनिकांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ओबीसी/व्हीजेएनटीचे जिल्हाध्यक्ष तथा सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर, शिंदखेडा तालुका प्रमुख मयूर बोरसे, शहराध्यक्ष भटु भोपे, वैद्यकीय मदत कक्षेचे शेखर बडगुजर, रवी शिंदे, महानगर संघटक प्रवीण वाडलेकर, उप महानगरप्रमुख अजय पाटील, शिंदखेडा तालुका प्रमुख भूषण बोरसे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे, कार्याध्यक्ष संजय पवार,दोंडाईचा शहराध्यक्ष प्रदीप सूर्यवंशी, शिंदखेडा शहराध्यक्ष सतीश सूर्यवंशी,राजू लोंढे, सनी मोरे, योगेश थोरात, रवी शिंदे, विभाग प्रमुख दत्ता मालोदे, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष भूषण पाटील आदी उपस्थित होते