*जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तुत्ववान महिलांचा भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहर अध्यक्षा यांच्याकडून सन्मान.
* आण्णा कोळी – दोडांईचा
अनेक स्त्रिया आपापल्या परीने जीवनात संघर्ष करून आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी एक स्थान निर्माण करत असतात. त्यापैकी मोजक्या स्त्रियांचे कष्ट, संघर्ष जनमानसापर्यंत पोहोचतात परंतु अनेक स्त्रियांचे संघर्ष हे चार भिंतीच्या आतच असल्यामुळे हे आपल्याला दिसत नसतात. अशाच अनेक समाजातून कर्तुत्ववान व मेहनती स्त्रियांचा सन्मान करण्याचे नामदार माननीय श्री जयकुमार जी रावळ कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या प्रेरणेने सौ.स्नेहा आरेकर आयाचित, दोंडाईचा शहर महिला मोर्चा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सन्मानित करायचे ठरविले. श्रीमती. सूर्याबाई प्रकाश टोपे, सौ.सुमनबाई योगेंद्रसिंग गिरासे, डॉ. सौ. मंजुलता ओमप्रकाश अग्रवाल, श्रीमती. जयश्री देविदास चव्हाण, श्रीमती ॲड.आशा जुम्मा मंसूरी, श्रीमती मथुराबाई ठाकूर, सौ.रुकमाबाई भाईदास भोई, श्रीमती. बिलवा विठ्ठल हळबे, सौ. रोहिणी रामलिंग लिंबारे, सौ. मायाबाई लक्ष्मण पाटील, सौ. अनिता सुनील वानखेडे, सौ. सुनिता राजेंद्र शर्मा, सौ. संगीता शैलेश जैन, सौ. नवसाबाई सुकलाल धनगर, जमुनाबाई राघो कोळी, सौ. कमलबाई पांडुरंग माळी, सौ. मुनीरा हुसैनभाई विरदेलवाला, सीमाबाई श्रावण बाटुंगे, उषाबाई शिवाजी वाघ, कविता कन्हैयालाल राजाणी, या महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाला सलाम करीत त्यांना ॲड.स्नेहा यांनी सन्मानपत्र व साडी देऊन गौरवीत केले.