*विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न*
लाला चव्हाण *आज विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथे जागतिक महिला दिन/सप्ताहाचे औचित्य साधून वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडाळी लोकनियुक्त सरपंच सौ. जयाताई ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं.सदस्या सौ.आशाताई चव्हाण,सौ. वैशालीताई गोसावी,ग्रा.पं सदस्य प्रतिनिधी श्री.मधुकर कंखरे,जी.एस.विद्यामंदिर मुख्याध्यापक श्री.एस.डी.भोई,पर्यवेक्षक श्री.व्ही.आर.पाटील,सामाजि क कार्यकर्ते श्री.तुषारगिरी गोसावी उपस्थित होते,राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन करण्यात आले सर्व मान्यवरांचा पुस्तके व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व 128 माता पालकांना स्कुल तर्फे पुस्तके सप्रेम भेट देण्यात आली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा कै.जगन्नाथ सदाशिव रोकडे यांच्या स्मरणार्थ ऍड.श्री.संजय जगन्नाथ माळी (उद्योजक नवी मुंबई) यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला “ऍग्रोवर्ल्ड आयोजित कृषी प्रदर्शन नृत्य स्पर्धेत” शहादा तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथून शिक्षण घेतलेले एकूण 03 विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवा येथे सिलेक्ट झाल्यामुळे त्यांना नवोदय “विकासरत्न पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले इंग्लिश मिडीयम स्कुलच्या शिक्षिका सौ.चेतना प्रवीण पाटील यांना “विकासरत्न आयडियल टिचर पुरस्कार” प्रदान करण्यात आला,उपस्थित माता पालक सौ.ललिताताई जगताप,सौ.मोहिनीताई पाटील,सौ.गितांजलीताई गोसावी यांनी मनोगत व्यक्त केली तसेच प्रमुख अतिथी सौ.वैशालीताई गोसावी,श्री.एस.डी.भोई सर, श्री.तुषारगिरी गोसावी यांनी देखील मनोगत व्यक्त केले कार्यक्रम प्रास्ताविक व वार्षिक इतिवृत्त श्री.चंद्रकांत रायसिंग सर यांनी सादर केले तर निवेदन सौ.अश्विनी सुर्वे मॅडम व आभार प्रदर्शन सौ. चेतना पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीते साठी सपना पटेल,निशिगंधा चौधरी,चैताली चौधरी,विशाखा शिंपी,रुपाली जगताप,रुचिरा चौधरी,दिव्यानी पाटील,शिक्षकेतर कर्मचारी सौ. कल्पना मोरे,सौ.रूपाली धनगर,श्री.राजेश गोसावी,श्री.जीवन मोरे,श्री.पप्पू गोसावी यांनी प्रयत्न केले*