तळोदा शहरात राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षाला राम राम..!शिवसेना शिंदे गटात प्रवेश
झुंजार क्रांती नेटवर्क प्रतिनिधी सुधीर गुरव नंदुरबार
बोरद- नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहर व तालुक्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे दि. ६ मार्च रोजी पार पडला.राज्यात गत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि राज्यात भाजप महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे विरोधकांचा सत्तेकडे जाण्याचा ओढा वाढला आहे. त्याच अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहर व तालुक्यात शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत दि. ६ रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे तळोदा शहर व तालुक्यात शिवसेनेला बळ प्राप्त झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.तळोदा तालुक्यातील ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यांनी वर्षांनुवर्षे भाजपशी लढा दिला आहे तसेच गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला होता. राज्य पातळीवर भाजप शिंदेंची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युतीत सत्तेत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर राजकारण वेगळे आहे. स्थानिक भाजपशी संघर्ष करायचा असेल तर सत्तेचे कवच असायला हवे,असा विचार पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे आणि म्हणून या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे स्थानिक पातळीवर आता भाजप-शिवसेना संघर्ष होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकारण चांगलेच तापणार असे चित्र दिसून येत आहे. सद्यस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा तळोदा तालुक्यासह शहरात प्रभाव वाढला आहे. शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावेउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार, तालुकाप्रमुख प्रवीण वळवी, माजी नगरसेविका प्रतीक्षा दुबे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रेखा माळी, युवा सेनेचे तालुकाप्रमुख कल्पेश सूर्यवंशी, युवासेना शहर प्रमुख जगदीश चौधरी, उपशहर प्रमुख जय सूर्यवंशी, युवा सेना उप जिल्हाप्रमुख सुरज माळी यांच्या सह विविध पदाधिकाऱ्यांनी शिंदे-शिवसेनेत प्रवेश केला.तळोदा शहरासह तालुक्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी जिल्हाध्यक्ष बुध बांधणी अभियान केसरसिंग क्षत्रिय, तळोदा पालिकेचे माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, जिल्हा उपाध्यक्ष विकासगिर गोसावी, जिल्हा सरचिटणीस गणेश पाडवी, युवक जिल्हा संघटक धर्मराज पवार, युवक जिल्हा उपाध्यक्ष शेख आदिल शेख दिलावर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाडवी, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अनिता संदीप परदेशी, नगरपालिकेचे माजी सभापती सुनंदापाळी, राष्ट्रवादीच्या तळोदा शोभा केसर सिंग क्षत्रिय यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.