*रेल्वे गेट १०३ क्रमांक शेजारील रहीवासी नागरिकांनी दिले, रेल्वे प्रशासनाला निवेदन..
..**असुरक्षितता व गैरसोयीकडे, रेल्वे प्रशासनाचे वेधले लक्ष रेल्वे फाटकजवळ डांबरीकरण करण्याची मागणी*
दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी
सध्या दोंडाईचा शहरातील रेल्वे फाटक क्रमांक १०३ हे वर्षभरात कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी प्रसिद्धी झोतात येत असते.आताही मागील आठ दिवसांपूर्वी रेल्वे गेट क्रमांक १०३ ओलांडताना एका नागरिकाला पायाला मोठी दुखापत झाल्याने,शेवटी नाईलाजाने रेल्वे फाटक शेजारील रहीवासी नागरिकांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी होत असलेले दुर्लक्ष व गैरसोयीकडे निवेदन देत वेधले आहे.याबाबत रेल्वे प्रशासनाचे सहायक अभियंता, नंदुरबार,आय.ओ.डब्यू, नंदुरबार, स्टेशन अधीक्षक, दोंडाईचा यांना दिलेल्या निवेदनाचा विषय असा की,खालील सह्या दिलेले रेल्वे गेट क्रमांक १०३ शेजारील रहिवासी नागरिक तक्रार देवून कळवू इच्छितो की, गेल्या काही दिवसांपासून गेट क्रमांक १०३ वर नागरिकांची गैरसोय होत आहे. जेव्हा फाटक बंद होते आणि गेट-फाटक उघडते. तेव्हा मोटरसायकल ,जड अवजड वाहने,स्कुल बसेस १०३ च्या फाटका शेजारी मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहने खड्ड्यामध्ये फसतात- अडकतात व परिणामी मोटरसायकल स्वार जागेवर स्लिप होतात.मागच्या आठवड्यात २८ फ्रेब्रुवारीला एक घटना रेल्वे गेट क्रमांक १०३ जवळ झाली.त्यात मोटरसायकल स्लिप झाल्याने एक व्यक्ती पायाला मोठी गंभीर जखम झाल्याने दुखापत होऊन १३ टाके त्याच्या पायाला लागले आहेत.रेल्वे प्रशासन नेहमी महिने सहा महिन्यांत रेल्वे गेट जवळ काम करत असल्याने रेल्वे गेटची मरम्मत करून स्व:ताच्या रेल्वे वाहन व रेल्वेत बसलेल्या प्रवाशांच्या जीवाची काळजी घेते पण रेल्वे गेट १०३ क्रमांक शेजारील ये-जा करणाऱ्या रहीवासी नागरिकांच्या जीवाची काळजी का घेत नाही?असा प्रश्न करत, ह्या प्रश्नांकडे व तेथील गैरसोयींकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.आज रेल्वे गेट क्रमांक १०३ वरून दररोज हजारो महिला -पुरूष,शाळेचे लहान बालक ये-जा करत असतात.म्हणून रेल्वे प्रशासनाने ह्या त्यांच्या हद्दीतील रेल्वे गेट क्रमांक १०३ च्या आजूबाजूला डांबरीकरण करावे, जेणेकरून रहिवासी नागरिकांचा दुखापतीपासुन जीव वाचून, सुरक्षितता त्यांना मिळेल, त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आम्ही जाहीर आभार मानू आणि रेल्वे प्रशासनाने जर आमच्या ह्या प्रश्नांकडे व होत असलेल्या गैरसोयींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात कोणत्याही फास्ट-धीमी गाडी पुढे काही घटना घडल्यास,त्यास फक्त न फक्त रेल्वे प्रशासनास जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.यावेळी निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष राशेदभाई सैय्यद,माजी नगरसेवक गिरधारीलाल रूपचंदानी,माजी नगरसेवक किशनभाई दोधेजा,माजी मुखी व भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्री किशोरभाई रूपचंदानी,माजी नगरसेवक श्री रविभाऊ जाधव,रशीद भाई मिर्जा आदींच्या सह्या आहेत.