*जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले महिला मंडळ प्रकाशा यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
…*आज दिनांक 8 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रकाशा या गावी श्री संगमेश्वर महादेव मंदिराचा प्रांगणात सावित्रीबाई फुले महिला मंडळ प्रकाशा यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रम आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या विषयी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच कार्यक्रमाचे आयोजक .श्री प्रकाश रमण वाडीले यांनी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ.भारतीताई भिल जि. प.सदस्य . प्रकाशा गावाचे उपसरपंच सौ. हेमलता ताई पाटील यांच्या अध्यक्षे खाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले सौ. डॉ.समिधा नटावदकर तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा.भारतीताई पवार अंधश्रद्धा निर्मूलन सदस्य शहादामा. रिमाताई पवार मा. नगर सेविका हे उपस्थित होते आणि आलेल्या सर्व मान्यवरांना सन्मानाने शाल पुष्प व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरेंद्र गुरव सर यांनी केले आणि प्रकाशा गावातील शेकडों महिला या कार्यक्रमात उपस्थित होते सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिव्यांनी ज्योत प्रज्वलित करून मान वंदना देऊन कार्यक्रमाला सुरुवात केले आणि महिलांना मार्गदर्शक करतांना भारती ताई पवार यांनी अंधश्रद्धे विषयी माहिती महिलांना दिली व स्त्रियांन्वर होणारा अत्याचार याला स्त्रिया कसे बळी पडतात या विषयी समजावून सांगितले तसेच स्त्री स्व:ता किती सक्षम आहे हे त्यांनी त्यांचा वक्तव्यात स्त्रीयांना पटवून दिले आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात झाले कार्यक्रमात लहान लहान मुलींनी आपल्या नाच गाण्यातून विविध असे वस्त्र पोषाक करून खुप छान असा सांस्कृतिक कला सादर करून कार्यक्रमातील सर्वांचे मन वळवून घेतले आणि कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण झाले तसेच कार्यक्रमाला पूर्णंत करण्यासाठी सहकार्य म्हणून प्रकाशा ग्रामस्थ , तसेच जागरूक नागरिक मंच आणि तापी माता आरती समिती यांचे सहकार्य लाभले …झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विजय परदेशी