*जागरूक नागरिक मंचातर्फे जागतिक महिला दिनी कायदेविषयक शिबिर संपन्न*
(पंकज गुरव प्रकाशा ) प्रकाशा:- शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे जागतिक महिला दिनानिमित्त जागरूक नागरिक मंचच्या वतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी मंचचे जेष्ठ सल्लागार डॉ.सनद भाई वाणी व श्री किशोर आण्णा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच राजनंदिनी भिल यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक उपसरपंच हेमलता पाटील यांच्या उपस्थितीत कायदेविषयक मार्गदर्शक अँड.सीमा खत्री मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक महिला दिन दर वर्षी 8 मार्च रोजी महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याप्रसंगी खत्री मॅडमांनी महिला भगिनींना महिला कायदेविषयक माहिती करून दिली. भारतीय राज्यघटनेने आपल्या आदर्श न्याय नियमावलीत महिलाविषयक नियमांना महत्त्वपूर्ण स्थान देऊन महिला उन्नतीसाठी अनेक कायद्यांची निर्मिती केली आहे. महिला कायद्या संदर्भात माहिती नसल्यामुळे अनेक प्रकारच्या अन्याय अत्याचार कौटुंबिक हिंसाचारास सामोरे जावे लागते. महिला संदर्भात वाढलेली गुन्ह्यांची संख्या तसेच महिलांच्या समस्या लक्षात घेता महिलांना महिलांसंदर्भात असलेले कायदे त्यातील तरतुदींची माहिती असणे आवश्यक आहे भारतीय कायदा महिलांना समानता हक्क आणि अधिकार अन्याय अत्याचार विरोधात गतिशील कारवाई करण्याचे निर्देश देत असते. तरी महिलांनी जागरूक होऊन या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्यात असे विविध कायद्यासंदर्भात अँड. सीमा खत्री मॅडम यांनी उपस्थित महिलांना सखोल मार्गदर्शन केले…[ भारतीय महिला सुदैवी म्हणाव्या लागतील कारण धार्मिक सामाजिक वैचारिक साहित्यिक आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रात महिलांची यशस्वी घोडदौड सुरू आहे ] “सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष तसेच सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड तुकाराम चित्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र बोरदे यांनी केले.