राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र सेवादलाच्या प्रदेश महिला सचिव संघटक प्रियाताई गायकवाड यांच्यावतीने महिला दिन उत्साहात संपन्न ———————————————————–बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)महिलांच्या अन्यायाविरुध्द आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहेत.समाजात वावरताना महिलांना येणारे प्रश्न आणि समस्या महिलांच्या संघटनानातूनच सोडवणे शक्य आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी माझ्या बहिणींना आई आईना सांगू इच्छिते की स्त्री शक्ती ही अमूल्य आहे,आपण सदैव सकारात्मक दृष्टीकोन ठेवून महिलांचे प्रश्न सोडवले पाहीजे असे महाराष्ट्र सेवादलाच्या प्रदेश महिला सचिव सौ.प्रियाताई गायकवाड यांनी महिलांना मार्गदर्शन करताना संबोधित केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवादलाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक प्रियाताई गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह बदलापूर येथील रेल्वे आरपीएफ ऑफीस,महिला न्यूज चॅनल एॅक्कर,सत्कर्म अनाथ आश्रम,बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन,शिवसेना उपशहर प्रमुख कार्यालय तसेच स्वतः बिझनेस करणा-या मुली अशा विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महिलांना भेट देऊन त्यांचा सत्कार व त्यांना महिला सशक्तीकरण कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र सेवादलाच्या प्रदेश महिला सचिव संघटक प्रियाताई गायकवाड यांच्यावतीने महिला दिन उत्साहात संपन्न
