*जायंट्स सहेली तरफे महिला दिन निमित्त अनोखा उपक्रम*स्त्री जन्माचे स्वागत अंतर्गत बेबी कीट वाटप
दि. ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दोंडाईचा जायंटस सहेली परिवाराने एक अनोखा उपक्रम राबवला. स्त्री जन्माचे स्वागत या कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा, सिद्धिविनायक दवाखाना, टोणगांवकर दवाखाना येथे ८ मार्च रोजी जन्म झालेल्या बालिकांना के.एम.अग्रवाल काकाजी यांच्या सहकार्याने सुंदर असे बेबी किट वाटप आणि त्यांच्या आईंना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. कन्या जन्माचे अत्यंत सुंदर रितीने स्वागत करण्यात आले. यावेळी जायंटस सहेलीच्या अध्यक्षा लता कोठावदे,सचिव मीनाक्षी जाधव,सीमा टाटीया,माजी अध्यक्षा संगीता देशमुख, माजी नगरसेविका मनीषा गिरासे,सुनीता गिरासे,प्रा.करुणा राजपूत,मीनाक्षी पाटील, योजना राजपूत,रंजना येवले या सर्व सहेली उपस्थित होत्या.आण्णा कोळी दोडांईचा